कोकण

''स्वामींचा कौल'' यात्रा उत्साहात

CD

swt615.jpg
35697
असलदे : स्वामींचा कौल विशेष यात्रेतून अक्कलकोट–पंढरपूर दर्शनासाठी गेलेले भाविक.

‘स्वामींचा कौल’ यात्रा उत्साहात
अक्कलकोट-पंढरपूर दर्शन : असलदेतील स्वामी समर्थ ट्रस्टतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ६ : असलदे येथील श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्टतर्फे स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनाचे औचित साधून ‘स्वामींचा कौल’ या विशेष यात्रेचे आयोजन केले. यात लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या ६९ भाविकांना विविध पवित्र स्थळांचे दर्शन घडविण्यात आले.
२७ रोजी पहाटे साडेपाच वाजता यात्रेला प्रारंभ होवून २९ तारखेला सकाळी सात वाजता यात्रेचा समारोप झाला. या दोन दिवसांच्या भक्तिमय प्रवासात भाविकांनी गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ, श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान, श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, श्री स्वामी समर्थ बाळाप्पा महाराज मठ, खंडोबा मंदिर अक्कलकोट, सिद्धेश्वर महादेव मंदिर तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दर्शन घेतले.
या यात्रेदरम्यान सर्व देवस्थानांच्या गाभाऱ्यात ट्रस्टच्या वतीने मानाची शाल व नारळ अर्पण करून भक्तीभाव व्यक्त करण्यात आला. संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमात सचिन लोके, प्रशांत साटम, ज्योती जाधव, प्रकाश जोईल, मधुसूदन भडसाळे, प्रकाश पावसकर, तात्या निकम, कांचन राणे, राजेंद्र पाताडे, तन्वी शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

दुसऱ्या बरोबर झोपलीये, आपल्याबरोबर का नाही येत... मेघा घाडगेने सांगितला तो धक्कादायक प्रसंग, म्हणाली,'तो दारू पिऊन तऱ्हाट...'

IPL 2026, MI vs RR: राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दाखल! मुबंई इंडियन्सने हरली अन् पंजाब - कोलकाताचंही स्वप्न तोडलं

Karnataka River Drowning Accident : नदीच्या प्रवाहात अचानक वाढ, शिंपले गोळा करण्यासाठी गेलेले ८ जण बुडाले; ७ महिलांचा समावेश

Jalna Water Crisis: अंबड तालुक्यातील मसई गावात पाण्यासाठी जीवघेणी कसरत; विजपंप बंद, ग्रामस्थांची उन्हात तहानलेली धावपळ

SCROLL FOR NEXT