कोकण

कणकवलीत डिझाईन, इंटिरियर क्षेत्रात नव्या संधी

CD

35738

कणकवलीत डिझाईन, इंटिरिअर क्षेत्रात नव्या संधी

संदेश पारकर : विद्यामंदिर मैदानात मेमध्ये ‘आगाज फॅशन शो’

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : कणकवलीसारख्या सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या शहरात ‘आगाज फॅशन शो २०२६’ सारखा सर्जनशील उपक्रम होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. फॅशन डिझाईन आणि इंटिरियरसारख्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवलीतील फ्लोरेट कॉलेजतर्फे ‘आगाज फॅशन शो २०२६’ हा उपक्रम ३ मे रोजी विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित केला आहे. या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, नीलेश पवार, किशोर कदम तसेच कॉलेजच्या संचालिका सार्था कदम यांनी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी संचालिका सार्था कदम म्हणाल्या, ‘कणकवलीतील फॅशन शो हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक आगळावेगळा आणि सर्जनशील उपक्रम ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीतून साकारलेली विविध आकर्षक आणि कल्पक थीम्सवरील गारमेंट्स या फॅशन शोमधून सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी मॉडेल्स म्हणून सहभागी होणार असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या डिझाईन्स आणि त्यामागील संकल्पना प्रेक्षकांसमोर उलगडल्या जाणार आहेत.
त्‍या म्‍हणाल्या, कणकवली परिसरात यापूर्वी झालेले फॅशन शो हे प्रामुख्याने मॉडेल्स भोवती केंद्रित असत. मात्र, ‘आगाज फॅशन शो २०२६’ हा पूर्णतः संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. त्याचा मुख्य केंद्रबिंदू विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘गारमेंट डिझाईन’ हा आहे. त्यामुळे हा केवळ मॉडेल्सचा नव्हे तर डिझायनर्सचा शो ठरणार आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नवकल्पनांची स्पर्धा रंगणार असून, विविध थीम्समधून त्यांचे कौशल्य पाहायला मिळणार आहे. याशिवाय, सिंधुदुर्गातील नामांकित मेकअप आर्टिस्ट्सचा सहभाग कार्यक्रमाला अधिक व्यावसायिक आणि आकर्षक रूप देणार आहे.
नीलेश पवार म्‍हणाले की, कणकवलीत होणाऱ्या फॅशन शोचे स्टेज डिझाईन आणि सजावट कॉलेजच्या इंटिरिअर विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे फॅशन, मेकअप आणि इंटिरिअर डिझाईन या तिन्ही क्षेत्रांचा संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक संस्कृती जपत फॅशन क्षेत्रात नव्या संधी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. किशोर कदम म्हणाले, या उपक्रमासाठी कणकवली नगरपंचायत आणि नगराध्यक्ष पारकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवती यात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT