कोकण

नव्या संकल्पाने सर्वोत्तम राष्ट्र घडवूया

CD

swt627.jpg
O35746
मालवण ः येथील भाजप कार्यालयात स्थापना दिन उत्साहात करण्यात आला.

नव्या संकल्पाने सर्वोत्तम राष्ट्र घडवूया
धोंडी चिंदरकर ः मालवणात भाजपचा स्थापना दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : भारत देशाला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत बनवण्यासाठी आपले योगदान द्या. नव्या ऊर्जेने, नव्या संकल्पाने पुढे जाऊया. भारताला जगातील सर्वोत्तम राष्ट्र बनविण्यासाठी एकत्र काम करूया, असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केले.
भाजप स्थापना दिनानिमित्त तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. यानिमित्ताने आज मालवण भाजप कार्यालयात गणेश पूजन तसेच भाजप पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी श्री. चिंदरकर हे बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुका सचिव महेश मांजरेकर, तालुका उद्योग व्यापार आघाडी रोहेश गावकर, तालुका सरचिटणीस पंकज सादये, राजू परुळेकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक ललित चव्हाण, यतीन खोत, राजू परब, केदार झाड, दाजी सावजी, महिला तालुकाध्यक्ष चारुशीला आचरेकर, महिमा मयेकर, रश्मी लुडबे, शिल्पा खोत, समृद्धी आसोलकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, पंचायत समिती उप सभापती श्याम झाड, पंचायत समिती सदस्य योजना कांबळी, दीपक सुर्वे आदी उपस्थित होते.
श्री. चिंदरकर म्हणाले, ‘आजचा हा दिवस केवळ एका राजकीय पक्षाच्या स्थापनेचा दिवस नसून, राष्ट्रनिष्ठा, त्याग, सेवा आणि विकासाच्या विचारांचा उत्सव आहे. भाजपने स्थापनेपासून देशहिताला सर्वोच्च मानत अखंडपणे जनसेवेचे कार्य केले आहे. भाजप हा केवळ एक पक्ष नाही, तर तो एक विचार आहे, एक चळवळ आहे.’
श्री. मांजरेकर म्हणाले, ‘आजचा हा दिवस फक्त एका पक्षाचा वर्धापन दिन नाही, तर देशसेवा, राष्ट्रवाद आणि विकासाच्या दृढ संकल्पांचा उत्सव आहे. ''सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास'' मंत्राने प्रेरित होऊन भाजप पक्षाने गेल्या अनेक वर्षांत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे कार्य केले आहे.’
भाजप स्थापना दिनानिमित्त मालवण तालुक्यात प्रत्येक बूथवर भाजप ध्वज फडकविण्यात आला. सदस्य नोंदणीसह विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

रणवीरने केली अजून एक नक्कल, श्रेया घोषालने सुद्धा दिली साथ, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... हा नाही सुधारणार

Court Decision: मोठी बातमी! बाप-लेकाच्या मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; तामिळनाडूतील कोर्टाचा निर्णय

New Labour Law: कर्मचाऱ्यांची लॉटरी! उरलेल्या सुट्ट्यांवर मिळणार थेट कॅश; एकही Leave वाया जाणार नाही, काय आहेत नवे नियम?

IPL 2026 Controvarsy: बस्सsss झालं... SRH ची मालकीण काव्या मारन संतापली, BCCI कडे आवेश खानसह दोन वादग्रस्त निर्णयाची तक्रार

SCROLL FOR NEXT