- rat७p५.jpg-
P26O35837
रत्नागिरी ः तालुक्यातील निरूळ परिसरामध्ये शेतकरी पावसाची चाहूल लागल्यामुळे भाताचा पेंडा सुरक्षितपणे ठेवण्याकरिता वाहतूक करताना शेतकरी.
पावस परिसरात शेतकऱ्यांची लगबग
चारा सुरक्षित ठेवण्यावर भर; पावसाची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ७ : गेल्या वर्षी पावसाने महिनाभर आधीच हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या अनुभवातून बोध घेत यावर्षी पावसाच्या पूर्वसंध्येला खबरदारी म्हणून तालुक्यातील निरूळ परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांचा चारा (पेंडा) सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. पावसाच्या चिंतेने शेतकऱ्यांमध्ये आत्तापासूनच धावपळ उडाली आहे.
गेल्या वर्षी पावसाचा लहरीपणा आणि भातकापणीच्यावेळी सतत कोसळलेल्या पावसामुळे भातशेती भिजून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच यावर्षी आंबा हंगामावरही बदलत्या हवामानाचा विपरीत परिणाम झाला असून, अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. आता त्यातच अवकाळी पावसाच्या सावटामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोणत्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता गृहित धरून, जनावरांसाठी असलेला भाताचा पेंडा ओला होऊ नये आणि भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी सतर्क झाले आहेत. शेतामध्ये उघड्यावर असलेला पेंडा आता सुरक्षित ठिकाणी किंवा गोठ्यात हलवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निसर्गाच्या लहरीपणामुळे ग्रामीण भागात शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
----
आंबापिकावर परिणाम
यावर्षी आंबापिक सुरुवातीच्या कालखंडामध्ये चांगल्या प्रकारे येईल, अशी शक्यता होती; मात्र बदलत्या हवामानामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे आंबापिक आवश्यक त्या प्रमाणात हाती आलेले नाही. त्यामुळे यावर्षी मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-----
कोट
यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्यामुळे भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यात भाताचा पेंडा खराब झाला. यासाठी यावर्षी जो काही शिल्लक पेंडा आहे तो जनावरांसाठी उपलब्ध व्हावा याकरिता पेंढा गोठ्यामध्ये सुरक्षितपणे ठेवण्याकरिता अनेक शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
- नीलेश ठीक, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.