कोकण

खेडच्या ''गेम चेंजर्स'' संघाने पटकावले जेतेपद

CD

- rat७p८.jpg-
26O35846
रत्नागिरी ः एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंडरआर्म ‘मेकॅनिक प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेला खेडचा गेम चेंजर्स संघ.

खेडच्या ‘गेम चेंजर्स’ संघाला विजेतेपद
मेकॅनिक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा; १० संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनतर्फे जिल्ह्यातील व्यावसायिक दुचाकी मेकॅनिकसाठी आयोजित ‘मेकॅनिक प्रीमियर लीग (MPL) क्रिकेट स्पर्धा २०२६’ उत्साहात पार पडली. शहरातील शिवरुद्र टर्फ, कृषी बाजार समिती, शांतिनगर येथे पार पडलेल्या या जिल्हास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत खेडच्या ‘गेम चेंजर्स’ संघाने बाजी मारत जेतेपदावर आपले नाव कोरले.
दुचाकी व्यावसायिकांना खेळाच्या मैदानात एकत्र आणण्याचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम होता. सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतून एकूण १० संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगलेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेचा अंतिम सामना गुहागर टर्फ टायटन्स आणि खेडचे गेम चेंजर्स यांच्यात अटीतटीचा झाला, ज्यामध्ये खेडच्या संघाने विजय मिळवला.
या स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीसाठी खेळाडूंना गौरवण्यात आले. यामध्ये मालिकावीर म्हणून रत्नागिरी ‘ब’ स्पिरीट संघाचा रोहित मुलुख, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रत्नागिरी ‘अ’ चेंजर्सचा जितेंद्र भुते तर अंतिम सामन्याचा मानकरी (मॅन ऑफ दी मॅच) आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून खेड गेम चेंजर्स संघाच्या अमरला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघासह सर्व वैयक्तिक विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

SCROLL FOR NEXT