कोकण

जि.प. शाळांच्या सुविधा, शिक्षकांचे प्रश्न सोडवू

CD

Rat७p९.jpg-
P26O35847
पणदेरी : बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे. सोबत पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, मुजफ्फर मुकादम, इरफान बुरोंडकर, संदेश चिले, बशीर परकार, विस्तार अधिकारी नजीर वलेले, जब्बार जनाब, मुजफ्फर लोगडे, मजहर हसवारे आदी.

शाळांच्या सुविधा, शिक्षकांचे प्रश्न सोडवू
अस्मिता केंद्रे ः पणदेरी उर्दू शाळेत शतक महोत्सवी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा तसेच शिक्षकांच्या विविध प्रश्नांना रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत अग्रक्रमाने मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी केले.
पणदेरी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘शताब्दी वर्षात प्रवेश करताना शाळेची कामगिरी उल्लेखनीय राहिली असून, यशाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे; मात्र, जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या आणि अपुरी शिक्षकसंख्या ही चिंतेची बाब असून, शासनस्तरावर त्यावर प्रभावी उपाययोजना केल्या जातील. उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तसेच शनिवारच्या शाळेच्या वेळेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, पुढील शैक्षणिक सत्रापासून पूर्वीप्रमाणे वेळ लागू करण्यात येईल,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, मुजफ्फर मुकादम, इरफान बुरोंडकर, संदेश चिले, बशीर परकार, विस्तार अधिकारी नजीर वलेले, जब्बार जनाब, मुजफ्फर लोगडे, मजहर हसवारे, अमीर कारविणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुस्तुफा तहविलदार, उपाध्यक्षा नाझिमा ठोकण, माजी अध्यक्ष किफायत ठोकण यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, कव्वाली आणि हास्यकविता सादर करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. पालक व ग्रामस्थांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शहझाद शेख आणि फौझिया खतीब यांनी विशेष परिश्रम घेतले. अहमद नाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
----
शताब्दी वर्षात उल्लेखनीय कार्य
मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख तन्वीर परकार यांनी शाळेच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, SQAAF मानांकन, तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणे अशा विविध क्षेत्रांत शाळेने उल्लेखनीय कामगिरी करून गाव व तालुक्याचा लौकिक वाढविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT