कोकण

-बलदेवाडी संघाने पटकावला कुणबी चषक

CD

- Rat७p११.jpg
26O35845
विरार: विजेत्या बलदेवाडी क्रिकेट संघास मान्यवरांच्या हस्ते कुणबी चषक प्रदान करताना.

कुणबी चषक ‘बलदेवाडी’ संघाकडे
मंडणगड क्रीडा असोसिएशनतर्फे स्पर्धा; किल्लावाडी उपविजयी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ७ ः मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनतर्फे विरार येथील नारंगी मैदानावर आयोजित केलेल्या कुणबी चषक क्रिकेट स्पर्धेत बलदेवाडी क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावत सलग दुसऱ्यांदा मानाचा चषक जिंकला तर किल्लावाडी संघाने उपविजेतेपद मिळवले. धामणी संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
तालुक्यातील निकष पूर्ण करणाऱ्या एकूण ३६ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रोमहर्षक सामने रंगले आणि प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात त्याचा आनंद लुटला. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये राजदीप भुवड याला सर्वोत्कृष्ट फलंदाज व सामनावीर (अंतिम सामना) पुरस्कार, युवराज फणसे याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, योगेश जाधव याला मालिकावीर तसेच राजदीप भुवड याला सर्वाधिक षटकारांचा मान मिळाला. आदित्य भुवड याने सर्वाधिक चौकारांचा किताब पटकावला तर पंकज तांबिटकर याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान, आदित्य भुवड याने स्पर्धेत नवा विक्रम नोंदवताना एका सामन्यात ६६ धावा करत गेल्या २५ वर्षांतील ६३ धावांचा विक्रम मोडला.
या स्पर्धेतील विजयी संघाला रोख पारितोषिकासह आकर्षक चषक, पंखा व सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बक्षीस वितरणावेळी माजी सभापती भाई पोस्टुरे, निवृत्त पोलिस अधिकारी रमेश घडवले, सुनील शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, सुनील माळी, मारुती पालणकर, मुरलीधर बैकर, रेश्मा डेरे, अनंत रटाटे, विजय ऐनेकर, भिकू रटाटे, विकास रटाटे, हेमंत शिगवण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारतमधील जेवणात सापडलं झुरळ, प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ, IRCTC कडून मोठी कारवाई

Success Story: ना ऑफिस, ना स्टाफ.. एआयच्या मदतीने दररोज कमावतोय २८ कोटी रुपये; कंपनी विकते 'हे' प्रॉडक्ट

Akshaya Tritiya 2026: 19 की 20 एप्रिल, कधी आहे अक्षय तृतीया? गोंधळ दूर करून जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि खास योग

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कोपा मॉल उडवून देण्याची धमकी

Umarga Crime : उमरगा तालुका हादरला! बेरडवाडीत पतीने केली पत्नी आणि आठ वर्षाच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या

SCROLL FOR NEXT