कोकण

सावंतवाडीला कायमस्वरूपी फिजीशीयन

CD

35866

सावंतवाडीला कायमस्वरुपी फिजिशियन

आंदोलनांना यश; आता मोठ्या शस्त्रक्रिया शक्य

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला पूर्णवेळ फिजिशियन मिळावा, यासाठी गेली ५ वर्षे सामाजिक संघटनांनी आंदोलन, उपोषणासह सर्व मार्ग अवलंबले होते. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली असून सावंतवाडीला कायमस्वरुपी फिजिशियन मिळाला आहे.
गेली ५ वर्षे फिजिशियन नसल्याने सावंतवाडीकरांचे हाल होत होते. सामाजिक संघटनांकडून यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे देखील केली होती. रुग्णकल्याण समितीचे सदस्य, आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचीही भेट घेतली होती. विविध सामाजिक संघटनांकडूनही यासाठी लढा दिला गेला होता. अखेर या लढ्याला यश आले असून डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी हे उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. फिजिशियन नसल्याने अनेक रुग्णांना उपचारांअभावी प्राण गमवावे लागले होते. काहींना गोवा, बांबोळीसह इतर पर्याय शोधावे लागत होते.‌ मात्र, आता फिजिशियन मिळाल्याने दिलासा मिळणार आहे. ‘मोड्यूलर आयसीयू’ विभाग देखील सक्षमपणे चालणार असून मोठ्या शस्त्रक्रिया देखील करता येणार आहेत.
---------
रुग्णांना दिलासा
दरम्यान, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून यासाठी देव्या सूर्याजी यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री नीतेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या उपस्थितीत फिजिशियन डॉ. विशाल रेड्डी यांचे स्वागत सावंतवाडीत करण्यात आले. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे प्रथमेश प्रभू, वसंत सावंत, मंदार सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT