कोकण

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार

CD

35929
35928

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढणार
कृषी सल्ला: पाणी व्यवस्थापन ठरणार महत्वाचे
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता.७: येत्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे फळबागांच्या पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देण्याचा कृषी सल्ला मुळदे येथील कृषी संशोधन केंद्रातर्फे आज देण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि कृषी विद्यापीठाने हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्यात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांचा (८ ते १२ एप्रिल) हवामान अंदाज वर्तवला आहे. या काळात जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नसून हवामान मुख्यत्वे कोरडे आणि अंशतः ढगाळ राहणार आहे.कमाल तापमान: ३२°C ते ३५°C दरम्यान राहील.किमान तापमान: २२°C ते २४°C दरम्यान राहील.जिल्ह्यासाठी कोणताही ''अलर्ट'' नाही, मात्र उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आंब्याची काढणी सकाळी १० वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतरच करा. भरउन्हात काढणी केल्यास फळांमध्ये ''साका'' पडण्याचे प्रमाण वाढते.फळधारणा झालेल्या झाडांना १५०-२०० लिटर पाणी १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. झाडाच्या बुंध्याशी पालापाचोळ्याचे आच्छादन करा. बागेत प्रति एकर २ ''फळमाशी रक्षक सापळे'' लावावेत, असा सल्ला आंबा बागायतदारांना दिला आहे. काजू बी स्वच्छ धुवून ३ दिवस कडक उन्हात वाळवावी. नारळाच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे दररोज ४० लिटर पाणी द्यावे. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झावळ्यांवर पाण्याचा जोरात फवारा मारावा, असेही यात म्हटले आहे.

चौकट
पाण्याचा काटकसरीने वापर करावा
वाढत्या उष्म्यापासून वाचवण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. कोंबड्यांच्या शेडच्या छतावर गवत किंवा भाताचा पेंढा टाकून त्यावर पाणी फवारावे, जेणेकरून शेडमधील तापमान कमी राहील. जल पातळी कमी होऊ लागली असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आजच्या रात्रीत संपूर्ण संस्कृती नष्ट होईल'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

मोठी बातमी! राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा, आज पुन्हा ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

Pune Robbery: निगडे गावातील जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; दोघा आरोपींना पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT