35937
कट्टा ‘बॅ. नाथ पै सेवांगण’ला
‘रोटरी’तर्फे डिजिटल फलक
ओरोस, ता. ७ ः बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे रोटरी क्लब, माहिम (मुंबई) यांच्या देणगीतून उपलब्ध झालेल्या डिजिटल फलकाचे उद्घाटन उत्साहात झाले. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
दीपक भोगटे यांनी क्लबच्या सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचा डिजिटल फलक, शिष्यवृत्ती वर्ग व इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. रश्मी पाटील यांनी ‘सेवांगण’च्या शिष्यवृत्ती वर्गासह विविध शैक्षणिक उपक्रमांचा गौरव करत हा फलक मंजूर केल्याचे सांगितले. या उपक्रमाचे श्रेय क्लबच्या शैला रेगे, सचिव सुनीता पडवळ आणि वंदना राजहंस यांना देत समन्वयकाची भूमिका पार पाडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. राऊळ यांनी ‘सेवांगण’च्या उपक्रमांमुळे अनेक शाळांची गुणवत्ता वाढल्याचे नमूद केले. सायली चव्हाण यांनी डिजिटल फलकाच्या माध्यमातून अभ्यासासह व्यक्तिमत्त्व विकास आणि इंग्रजी संभाषण कौशल्य वाढवण्यावर भर द्यावा, असे सांगितले. बाळकृष्ण नांदोसकर यांनी सूत्रसंचालन केले. मनोज काळसेकर, विद्या चिंदरकर आणि बाळकृष्ण गोंधळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल फलकावर प्रत्यक्ष अभ्यास सादर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.