कोकण

फोंडाघाट वैश्य समाज संस्थेला तीन कोटी पाच लाखांचा नफा

CD

फोंडाघाट वैश्य समाज संस्थेला
तीन कोटी पाच लाखांचा नफा

कणकवली, ता. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित, फोंडाघाट या पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ३ कोटी ५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. संस्थेचे अध्यक्ष गणपत वळंजू आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांनी ही माहिती दिली.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या फोंडाघाटसारख्या छोट्या गावातून १९९१ साली सुरू झालेली ही पतसंस्था आज संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्षेत्र विस्तारत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ‘विना सहकार नाही उद्धार’ या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने नफा कमावण्यापेक्षा सभासदांच्या आर्थिक सबलीकरणाला प्राधान्य दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही संस्थेची खासियत ठरली आहे. सीबीएस प्रणालीसोबतच मोबाईल ॲप, एनईएफटी, आरटीजीएस, आएसपीएस, क्यूआर कोड, एसएमएस अलर्ट, नेट बँकिंग, डोअर स्टेप बँकिंग आणि पेपरलेस व्यवहार यांसारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केल्या आहेत. पिग्मी संकलनासाठी मोबाईल ॲपचा वापर सुरू असून लवकरच ‘स्कॅन अँड पे’ सुविधाही देखील उपलब्ध होणार आहे, असे अश्री.वळंजू यांनी सांगितले.
श्री.पावसकर म्‍हणाले की, पतसंस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आलेखही उल्लेखनीय आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस भागभांडवल ३ कोटी ८६ लाखांवर पोहोचले असून त्यात ६.२८ टक्के वाढ झाली आहे. ठेवी १९१ कोटी ०७ लाख (२६.८२% वाढ), कर्ज वितरण १५४ कोटी ६० लाख (२१.७०% वाढ), निधी १४ कोटी ६० लाख (२५.४२% वाढ) आणि गुंतवणूक ५७ कोटी ५९ लाख (४२.८४% वाढ) इतकी झाली आहे. संस्थेचा ढोबळ नफा १० कोटी ७९ लाख असून आवश्यक तरतुदीनंतर ३.०५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. विशेष म्हणजे या नफ्यात ३२.५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. खेळते भांडवल २२० कोटी ८५ लाखांवर पोहोचले असून एकूण उलाढाल १३६५ कोटी ८० लाखांपर्यंत गेली आहे. श्री.वळंजू म्‍हणाले, वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सभासदाभिमुख योजना राबवण्यावर संस्थेचा भर आहे. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, सिंधुदुर्गात आचरा तर रत्नागिरीत पाचल येथे नवीन शाखा सुरू केल्या. तसेच लवकरच राधानगरी आणि राजापूर येथे नवीन शाखा सुरू होणार आहेत. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुशे, संचालक दिलीप पारकर, सुनिल कोरगांवकर, गणपत पारकर, संजय पेडणेकर, सुनिल डुबळे, ॲड. समीर वंजारी, उमेश वाळके, अनिता रेवडेकर, रश्मी माणगांवकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT