कोकण

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अहवालास मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

CD

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेस
मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : दरवर्षीप्रमाणे सरत्या वर्षाचा आर्थिक अहवाल ३१ मार्च रोजी जाहीर करण्याची प्रथा स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने जपली. हा अहवाल पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश देऊन सुखद आश्चर्याचा धक्का दिला आहे, अशी प्रतिक्रिया पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पतसंस्थेच्या उत्तुंग कामगिरीची दखल घेत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा संदेश येणे, ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदेशात म्हटले आहे की, संस्थेची सातत्यपूर्ण प्रगती समाधानकारक असून, सहकार क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी आहे. कोकणातील, विशेषतः रत्नागिरीसारख्या भागात सहकार चळवळीच्या माध्यमातून जनसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सहकार चळवळीला बळकटी देत नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संस्थेने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.
पुढील काळातही संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Lockdown: आज रात्रीपासून पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन! पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घोषणा

IIT Baba Abhay Singh Story: आयआयटी बाबा अभय सिंहची पत्नी प्रितीका कोण?; ‘युनिव्हर्सिटी’ काढण्याचे स्वप्न, दोघांची भेट पवित्र ठिकाणी

Sinhgad Road News : अंतीम प्रवासावर अंधाराची छाया! वडगावात दुचाकीच्या उजेडात पार पडले अंत्यसंस्कार; मृत्यूनंतरही असुविधांची साथ, नागरिकांचा संताप

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

SCROLL FOR NEXT