-rat7p21.jpg-
P26O35914
रत्नागिरी : भाजपच्या वर्धापनदिनी ध्वजवंदन करताना पदाधिकारी, कार्यकर्ते.
---------
भाजपच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : भारतीय जनता पक्षाचा ४६वा वर्धापनदिन रत्नागिरी जिल्हा कार्यालयात साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. बाबा परूळेकर तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्या शिल्पा पटवर्धन यांनी पक्षाचा इतिहास, पक्षाची वाटचाल आणि कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे संघटना अधिक मजबूत करावी यावर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक शिस्त, जनसंपर्क आणि समाजाभिमुख काम यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायण पूजा विधीपूर्वक पार पडली. संध्याकाळी महिला कार्यकर्त्यांनी भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. या वेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, अशोक वाडेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, बावा नाचणकर, सभापती संदीप सुर्वे, बाबू सुर्वे, पदवीधर सेलचे मनोज पाटणकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी उपस्थित होते. शहर सरचिटणीस नीलेश आखाडे यांनी सूत्रसंचालन केले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.