कोकण

कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांचे तायक्वांदो राष्ट्रीय पंच परीक्षेत यश

CD

kan82.jpg
36143
रत्‍नागिरी : येथे झालेल्‍या राष्‍ट्रीय तायक्‍वांदो परीक्षेत सिंधुदुर्गातील कुणाल नारकर आणि सोनिया ढेकणे यांनी यश मिळविले आहे.

कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांचे
तायक्वांदो राष्ट्रीय पंच परीक्षेत यश
कणकवली, ता. ८ : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई )आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने घेतलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाल नारकर, सोनिया ढेकणे यांनी यश मिळवले आहे. तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत व श्रीनिधी सावंत यांनी यश मिळवले.
ही परीक्षा रत्नागिरी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे घेतली होती. या परीक्षेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ही परीक्षा तायक्वांदो खेळातील तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता आणि आत्मसंरक्षणाच्या विविध अंगांचा कस लावणारी असल्याने ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यासाठी त्यांना मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर तसेच पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे, अमित जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT