राजापूरात ‘किलबिल पाखरे’ची धूम
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव; गुणवंतांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ : येथील जिल्हा परिषद विश्वनाथ विद्यालय शाळा क्र. १चे वार्षिक स्नेहसंमेलन ‘किलबिल पाखरे’ या उपक्रमांतर्गत राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे आणि नगरसेवक दिलीप चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी ॲड. खलिफे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. तसेच, शाळेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनीही शाळेच्या दर्जेदार गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले.
स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रातील चमकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी सातवीतील दुर्वांक नलावडे याची ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून तर शिक्षिका अंकिता बाणे यांची ‘आदर्श शिक्षक’ म्हणून निवड करून गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.