कोकण

समुद्री शैवाल शाश्वत उत्पन्न

CD

-rat९p१४.jpg-
26O36289
डॉ. वैभव मंत्री
-------

समुद्री शैवाल शाश्वत उत्पन्न- भाग ३ (लोगो)

जागतिक स्तरावर ३६ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत उत्पादन
डॉ. वैभव मंत्री ः दहा प्रकारात अढळ, १८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : जगभरात सुमारे १० हजार प्रकारचे समुद्री शैवाल आढळतात तर भारतात सुमारे एक हजार प्रकार नोंदवले गेले आहेत. जागतिक स्तरावर समुद्री शैवाल उत्पादन सुमारे ३६ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले असून, त्याची किंमत अंदाजे १८ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय मीठ व सागरी रसायन संशोधन संस्था (भावनगर, गुजरात) येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वैभव मंत्री यांनी दिली.
त्यांनी समुद्री शैवाल विविधता आणि उत्पादनाची जागतिक तसेच राष्ट्रीय स्थिती स्पष्ट केली. भारतात अगर उत्पादनासाठी समुद्री शैवालाचा वापर १९४०च्या सुमारास ग्रॅसिलेरिया एड्युलिस या प्रजातीपासून सुरू झाला. कृसडाई बेटावर या प्रजातीची प्रायोगिक शेती ही देशातील संघटित समुद्री शैवाल शेतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
१९७०पर्यंत सुमारे ५०० प्रजातींची ओळख झाली होती. १९४० ते १९६०, १९६० ते २००० आणि २००० नंतरच्या काळात समुद्री शैवाल संवर्धन व प्रक्रिया तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर अगर उत्पादनात मोठी वाढ झाली.
या सत्रात समुद्री शैवाल क्षेत्रातील औद्योगिक वाढ आणि उद्योजकतेच्या संधींवरही प्रकाश टाकण्यात आला. शैवाल प्रक्रियेशी संबंधित प्रमुख उद्योगांचा उल्लेख करताना, या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग जवळपास दहापट वाढतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
समुद्री शैवाल शेतीच्या तांत्रिक बाबींवरही विशेष लक्ष देण्यात आले. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध राफ्ट डिझाइन्सचे वर्णन करण्यात आले, ज्यात त्रिकोणी, उभा आणि तिरपा राफ्ट यांचा समावेश आहे. या पद्धतींमुळे कार्यक्षमता वाढवणे, जागेचा योग्य वापर आणि पीक व्यवस्थापन सुलभ होते.
रोपनिर्मिती आणि नर्सरी विकास हे समुद्री शैवाल शेती विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. नर्सरीच्या माध्यमातून प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे २५ हजार रोपे तयार करता येतात, ज्यामुळे कच्च्या मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित होतो. मोठ्या प्रमाणावर शेती करताना पिकांचे आरोग्य, पर्यावरणीय सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकण्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(क्रमश:)
-----
मूल्यवर्धित उत्पादने
या प्रसंगी सागरी जैविक संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. ए. यू. पागारकर यांनी समुद्री शैवाल प्रक्रियेमधील तांत्रिक नवकल्पना आणि मूल्यवर्धन या विषयावर सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी रत्नागिरी किनारपट्टीवर उपलब्ध असलेल्या समुद्री शैवालांपासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित उत्पादनांचे उदाहरणांसह स्पष्टीकरण केले
-----
नवकल्पना, तांत्रिक प्रगती, संधी
कार्यशाळेत समुद्री शैवाल शेतीत नवकल्पना, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील संधींवर भर देण्यात आला. प्रजातींची विविधता, शेतीपद्धती, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी, रोपनिर्मिती, औद्योगिक उपयोग आणि धोरणात्मक पाठबळ या सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : भांडुपमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा 19 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT