कोकण

गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर सवलत

CD

कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनातील
गृहोपयोगी वस्तू खरेदीवर सवलत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : कन्झ्युमर्स शॉपी या गृहोपयोगी व गृहसजावटीच्या वस्तूंचे प्रदर्शन येत्या १५ एप्रिलपासून पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर सुरू होणार आहे. यामध्ये विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंवर सवलतही कंपन्यांच्यावतीने देण्यात आली आहे. प्रदर्शन १५ ते १९ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सर्वांना विनामूल्य खुले आहे.
कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनाची संकल्पना राबवताना संपूर्ण कुटुंब आणि त्यातील प्रत्येकाच्या गरजा यांचा विचार अतिशय बारकाईने करण्यात आलेला असतो. एकाच ठिकाणी अनेक वस्तू उपलब्ध झाल्याने आणि दरही अतिशय माफक असल्याने यात मनसोक्त खरेदी करता येऊ शकते.
या प्रदर्शनात वाघबकरी चहा, पितांबरी, सिमंधर हर्बल, टीटीके प्रेस्टिज लि., ओलिव्हिया, नीशा हर्बल, निलप, बजाज, नॅनो नाईन, व्हिडिओ, रसम मसाले, जीनियस हेल्थकेअर, आयरिश कलेक्शन, संजीवन, नक्षत्र एंटरप्रायझेस, जडीबुटी आदी अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. हँडीक्राफ्ट, ज्वेलरी, साडी, लेदर पर्सेस, लेडीज गारमेंट, लखनवी फुलकारी, गारमेंट्स, टॉप्स, फूड प्रॉडक्ट्स, पापड, हेल्थकेअर प्रॉडक्ट्स, चहा, सौंदर्यप्रसाधने, वॉटर प्युरिफायर, नॉनस्टिक कूकवेअर, ओव्हन्स, सुईंग मशिन, मिक्सर, फूड प्रोसेसर, अगरबत्ती, कार्पेट्स, बेडशिट्स, लहान मुलांचे कपडे, फर्निचर, स्टेनलेसच्या विविध किचनमध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू, लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी व व्हेंटिंगमध्ये विविध डिशेस उपलब्ध आहेत.

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

Baramati News: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे का घेतला? हर्षवर्धन सपकाळांनी खरं कारण सांगितलं; आतली बातमी आली समोर

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

SCROLL FOR NEXT