कोकण

-मुंबई विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद

CD

-rat१०p२.jpg -
P26O36458
संगमेश्वर ः राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वसाधारण व वैयक्तिक विजेतेपदाच्या चषकासह सांस्कृतिक समन्वय सावे, कला मार्गदर्शक चोपडेकर व रहाटे, यशवंत विद्यार्थी चव्हाण व म्हात्रे.
----
मुंबई विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद
राष्ट्रीय युवा महोत्सव; ललित कला विभागात यश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० ः चेन्नई येथील ‘सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ येथे झालेल्या ३९व्या अखिल भारतीय ‘आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६’ मध्ये मुंबई विद्यापीठाने फाईनआर्ट (ललित कला) विभागात सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
मुंबई विद्यापीठ संघाने या महोत्सवात विविध कलाप्रकारांत छाप पाडली. विशेषतः शोभायात्रेत ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे’ अत्यंत प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली आणि सुवर्णपदक हस्तगत केले. याशिवाय कोलाज आणि रांगोळी या दोन्ही कलाप्रकारांत विद्यापीठाचा विद्यार्थी मनोज चव्हाण याने सुवर्णपदकाची कमाई केली तर मातीकाम प्रकारात प्रथमेश म्हात्रे याने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
या विजयी संघाला देवरूखचे सुपुत्र विलास रहाटे आणि केसर चोपडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापिठाला फाईनआर्ट विभागात तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्तरावरील सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. विशेष म्हणजे, रहाटे यांनी आपल्या विद्यार्थिदशेतही मुंबई विद्यापीठाला दोनवेळा राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT