केबीबीएफ रत्नागिरी विभागाच्या
अध्यक्षपदी सुहास ठाकूरदेसाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : कऱ्हाडे ब्राह्मण बेनेव्होलंट फाउंडेशन (केबीबीएफ) या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावयासिक संघटनेच्या रत्नागिरी विभागाच्या अध्यक्षपदी हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकूरदेसाई यांची फेरनिवड झाली आहे.
संघटनेच्या रत्नागिरी विभागाच्या बैठकीत नव्या आर्थिक वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये ठाकूरदेसाई यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली असून, प्रशांत आचार्य यांची कोषाध्यक्ष आणि मुग्धा करंबेळकर यांची सचिव म्हणून निवड झाली आहे. कऱ्हाडे व्यावसायिक ज्ञातीबांधवांना एकत्र करून रोजगार संधी उपलब्ध करणे, पर्यटन विकास, परिसराच्या विकासासाठी योगदान देणे असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ठाकूरदेसाई यांनी सांगितले.
पितांबरी उद्योगसमूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रेरणेतून आणि नेतृत्वाखाली गेल्या १३ वर्षांत केबीबीएफने राज्यभर आपला ठसा उमटवला आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि बडोदा अशा शाखांमधून अडीचशेहून अधिक उद्योजक या परिवाराचा भाग झाले आहेत. ज्ञातीपलीकडील नाती जपणारा दृष्टिकोन, दर ६ महिन्यांनी होणारी ग्लोबल मीट, तज्ज्ञांकडून व्यवसाय मार्गदर्शन, यशस्वी उद्योजकांचे अनुभव, नवीन बिझनेस कनेक्शन्स आणि संधी, स्वतःच्या व्यवसायवाढीसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म ही या संघटनेची वैशिष्ट्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.