कोकण

जनशताब्दी''ला विलवडे स्थानकात थांबा द्या

CD

- rat१०p४.jpg-
26O36460
राजापूर ः विलवडे रेल्वस्थानक

‘जनशताब्दी’ला विलवडे स्थानकात थांबा द्या
खासदार नारायण राणे यांना साकडे; ७० गावांमधील नागरिक अवलंबून
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः कोकण रेल्वेमार्गावरील विलवडे (ता. लांजा) स्थानक हे लांजा, राजापूर, वैभववाडी आणि शाहूवाडी (जि. कोल्हापूर) या चार तालुक्यातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे केंद्र ठरत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी मुंबई (सीएसएमटी) - मडगाव ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ला थांबा मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुडेकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, जनशताब्दी एक्स्प्रेसला विलवडे येथे थांबा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रत्नागिरीनंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी याच परिसरातून मुंबईला ये-जा करत असतात; मात्र, मोजक्याच गाड्या या स्थानकावर थांबत असल्याने प्रवाशांना अन्य स्थानकांवर उतरून पुढे प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून, त्यांना अनावश्यक आर्थिक आणि मानसिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
विलवडे स्थानक परिसरातील सुमारे ७० गावांमधील नागरिक रेल्वेप्रवासासाठी याच स्थानकावर अवलंबून आहेत. जनशताब्दी ही दैनंदिन धावणारी महत्त्वाची गाडी असून, तिला विलवडे येथे थांबा मिळाल्यास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल. या मागणीचा गांभीर्याने विचार करून रेल्वेप्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
---
तीन जिल्ह्यांना जोडणारा दुवा
कोकण रेल्वेमार्गावरील विलवडे स्थानक हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. या स्थानकावरून लांजा, राजापूरसह वैभववाडी आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी एसटी बससह खासगी वाहनांचीही चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. त्यामुळे या स्थानकाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal Baramati : 'उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर...', हर्षवर्धन सपकाळांचा पवारांच्या बालेकिल्ल्यात इशारा

RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Latest Marathi News Live Update : TVK प्रमुख आणि अभिनेता विजय कराईकुडी येथे निवडणूक प्रचार करत आहेत

Khaby Lame Divorce: नंबर 1 टिकटॉकरचा घटस्फोट चर्चेत! 20 मिलियन डॉलर संपत्ती, पण मालकी कुणाची? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT