- rat१०p७.jpg-
26O36464
पावस ः येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयात सुरू केलेल्या फुलराणी कक्षाच्या उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
पावसमध्ये ‘फुलराणी कक्ष’ सुरू
राज्यात पहिला ; विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः शालेय विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी आणि मासिक पाळीच्या काळात त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील पहिला ‘फुलराणी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शालेय विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात अनेक शारीरिक व मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. या संवेदनशील काळात त्यांना योग्य स्वच्छता, विश्रांतीची जागा, आवश्यक आरोग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळणे गरजेचे असते. ही गरज ओळखून ‘फुलराणी कक्ष’ संकल्पना मांडण्यात आली आहे. या कक्षामध्ये सॅनिटरी पॅड्ससह स्वच्छता साहित्य, आरामासाठी स्वतंत्र जागा आणि तज्ज्ञांकडून समुपदेशन अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
आजकल किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओडी (Polycystic Ovarian Disease) सारख्या आरोग्यसमस्या वाढत आहेत. या समस्यांबाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करून त्यावर योग्यवेळी उपचार मिळवून देण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे विद्यार्थिनींचे आरोग्य सुरक्षित राहण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे मासिक पाळीबाबतचे सामाजिक गैरसमज दूर होऊन विद्यार्थिनींमध्ये आरोग्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.
-----
शाळांमध्ये विस्तारणार उपक्रम
‘अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबवण्याचा मानस आहे. ‘फुलराणी कक्ष’ हा केवळ एक उपक्रम नसून, विद्यार्थिनींच्या आरोग्यदायी, सन्मानपूर्ण आणि सशक्त भविष्यासाठी उचललेले एक संवेदनशील पाऊल आहे,’ असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी या वेळी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.