कोकण

रिक्षा चालकांचा उतरविला २ लाखांचा विमा

CD

swt109.jpg
36526
मालवण : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने रिक्षा चालकांचा विमा उतरविण्यात आला.

रिक्षा चालकांचा उतरविला दोन लाखांचा विमा
मालवण शिवसेनेचा पुढाकार : नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांचा दोन लाखाचा विमा उतरविण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना जिल्हा संघटक व स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, शहरप्रमुख व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, विनायक बाईत, माजी नगरसेवक जॉन नरोन्हा, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, शानु वालावलकर, नगरसेविका नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, राजा गावकर, विश्वास गावकर, बाळू नाटेकर, भाऊ मोर्जे, वसंत गावकर, उद्योजक परशुराम पाटकर, सूर्यकांत फणसेकर, गुरू मणचेकर आदी उपस्थित होते.
खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिनानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून रिक्षा चालकासाठी २ लाखाचा विमा उतरविला गेला आहे. यात नांव नोंदणी केलेल्या पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे असे विशेष आवाहन करण्यात आले होते. ६० वर्षाच्या आतील विमाधारकाला अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची १०० टक्के रक्कम, अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विम्याची १०० टक्के रक्कम विमा धारकास मिळणार आहे असे या विम्याचे स्वरूप आहे.
यावेळी रिक्षा चालक निलेश लुडबे, संकेत राऊळ, राजा मांजरेकर, विठू वराडकर, पंकज मसूरकर आदी उपस्थित होते.

चौकट
नारायण राणेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
लाभार्थी रिक्षा चालकांच्या वतीने निलेश लुडबे यांनी समाधान व्यक्त करत शिवसेनेचे तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी वर्गाचे आभार मानले. उपस्थित व विमा लाभार्थी रिक्षा चालकांच्या वतीने खासदार नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत त्यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दर महिन्याच्या १० तारखेला विविध उपक्रम आयोजीत करत साजरे करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sapkal Baramati : 'उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर...', हर्षवर्धन सपकाळांचा पवारांच्या बालेकिल्ल्यात इशारा

RR vs RCB Weather Update: विराट कोहली- वैभव सूर्यवंशी, संघर्षावर पावसाचं सावट; RR ने MIला जसे धुतले, तसेच RCBला चोपावे लागणार

Shirol Accident news : आठ दिवसात ३ वेळा नशीबाची साथ, पण नियतीच्या मनात वेगळचं होतं, शिरोळचा आकाश अपघातातच गेला

Latest Marathi News Live Update : TVK प्रमुख आणि अभिनेता विजय कराईकुडी येथे निवडणूक प्रचार करत आहेत

Khaby Lame Divorce: नंबर 1 टिकटॉकरचा घटस्फोट चर्चेत! 20 मिलियन डॉलर संपत्ती, पण मालकी कुणाची? नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT