कोकण

कुत्रा आडवा आल्यामुळे मोटारीला भीषण अपघात

CD

36551

भरधाव मोटार कुत्र्यामुळे
दुभाजक ओलांडून उलटली

चालकासह प्रवासी सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० : मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव-जोशी मांजरेकरवाडी सर्कलनजीक कुडाळहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकीचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात चालक आणि प्रवासी बचावले.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव मोटार गोव्याच्या दिशेने जात असताना मळगाव परिसरातील मांजरेकरवाडी सर्कलजवळ आली. यावेळी अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाने प्रसंगावधान राखून जोरात ब्रेक लावला. मात्र, मोटार अनियंत्रित झाली आणि थेट दुभाजक (डिवायडर) ओलांडून पलीकडच्या मार्गावर जाऊन कोसळली. ​हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये मोटारीच्या दर्शनी भागाचे आणि डाव्या बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. महामार्गावर अचानक प्राणी आडवे येत असल्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT