कोकण

-‘सर्पदंशमुक्त मंडणगड’ अभियानाचा प्रारंभ

CD

‘सर्पदंशमुक्त मंडणगड’ अभियान सुरू
सुनील कदम यांचा पुढाकार; वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.११ ः शेतीचे रक्षण आणि पर्यावरण संतुलनासाठी साप हे माणसाचे नैसर्गिक मित्र असल्याने त्यांच्याविषयी असलेले गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्पमित्र सुनील कदम यांनी देव्हारे येथे केले. मानव अभ्याससंघ आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘सर्पदंशमुक्त मंडणगड तालुका’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
देव्हारे येथील पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिरात झालेल्या या कार्यक्रमात कदम यांनी सापांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित केले. उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गाने सापांची निर्मिती केली आहे. ते नैसर्गिक पेस्टकंट्रोलचे काम करतात, असे त्यांनी सांगितले. धार्मिक श्रद्धा असूनही गैरसमजांमुळे सापांच्या हत्यांचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोकणात शेती करताना पायात बूट किंवा चप्पल न घालणे तसेच जमिनीवर झोपण्याची सवय यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढतात. त्यामुळे आपण आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला. सर्पदंश झाल्यास विषारी आणि बिनविषारी साप ओळखण्याची लक्षणे, प्राथमिक उपचार आणि तातडीने वैद्यकीय मदत कशी मिळवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अंधश्रद्धा, मंत्रतंत्र यांना बळी न पडता वैज्ञानिक पद्धतीने उपचार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘सर्पदंशमुक्त मंडणगड’ अभियान यशस्वी करण्यासाठी तालुकाभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. कार्यक्रमास सभापती प्रणाली चिले, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, माजी सभापती भाई पोस्टुरे, सरपंच प्रमिला दळवी, निवासी नायब तहसीलदार सुदर्शन खानविलकर, मुख्याध्यापक रामचंद्र कापसे, शैलेश घोसाळकर यांच्यासह विविध अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asha Bhosle: ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, कशी आहे प्रकृती?

CSK vs DC Live : १९ चेंडूंत ८४ धावा अन् शतक... संजू सॅमसनची ऐतिहासिक कामगिरी; MS Dhoni चा विक्रम मोडला, ९ मोठे पराक्रम

Sinhgad Road : खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाच्या डोळ्यात घातले अंजन

CSK vs DC Live : संजू सॅमसनचे शानदार शतक! IPL 2026 मधील पहिली Century; आयुष म्हात्रेही बरसला, चेन्नईने धावांचा डोंगर उभा केला

Pune News : सुनेत्रा पवारांना शिवसंग्रामचा पाठिंबा; डॉ. ज्योती मेटे यांची घोषणा

SCROLL FOR NEXT