राजिवडा खाडी गाळउपसा लवकरच सुरू
उदय सामंत ः १४७ कोटीच्या आराखड्याला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : राजिवडा खाडीतील गाळ काढण्याच्या कामाचा १४७ कोटींचा आराखडा तयार आहे. निविदा प्रक्रियादेखील झाली आहे. काम लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. प्रारंभासाठी वाट पाहू नये. त्या विभागाच्या मंत्र्यांशी मी बोलून घेतो, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबारात दिले.
राजिवडा येथील एका ज्येष्ठ नागरिकाने रस्ता आणि गाळाचा प्रश्न उपस्थित केला. या वेळी खाडीतील मार्ग तयार करण्यासाठी व गाळउपशासाठी सुमारे १४७ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून, याला मंजुरी मिळाली आहे. या कामाच्या प्रारंभासाठी या खात्याच्या मंत्र्यांची वेळ मागितली असल्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी सामंत यांनी आपण संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलतो; परंतु कामाला लवकर सुरुवात करा. आम्ही दोघेही त्या कामाच्या उद्घाटनाला येऊ असेही स्पष्ट केले. त्याचप्रमाणे राजिवडा येथील बंदराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही होईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
महावितरणच्या कारभाराचा पंचनामा
विशेषत: महावितरणबाबत अनेक तक्रारी सर्वसामान्य नागरिकांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही मांडल्या. सिंगल फेजचे थ्रीफेज करून देण्यात अनेक ठिकाणी दुर्लक्ष होत असल्याचे मत काही ग्रामस्थांनी मांडले. रत्नागिरी तालुक्यातील एका गावात सहा महिने बिलेच मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. बिले वाटप केली जात नसतानाही विजेचे कनेक्शन बिल भरले नाही म्हणून तोडण्यास कर्मचारी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर मंत्री सामंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेत कारभाराचा पंचनामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.