कोकण

चिपळूणात आजपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

CD

चिपळुणात आजपासून क्रिकेट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला उद्या (ता. १२) पासून चिपळुणात सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या उद्‍घाटनास मुंबईचे माजी रणजीपटू व निवड समिती सदस्य सुनील मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.
शहरातील पवन तलाव मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. क्रिकेट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मुंबई क्रिकेटमधील भक्कम कारकीर्द यामुळे मोरे हे नाव क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मोरे यांनी १९९२ ते १९९६ या कालावधीत मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्या काळात सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर आणि अमोल मुझुमदारसारख्या दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी २५ प्रथम श्रेणी सामन्यांत ४४च्या सरासरीने १५०३ धावा केल्या आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या तरुण खेळाडूंना सुनील मोरे यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Case : पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीची जामिनावर सुटका होताच जंगी पार्टी, गळ्यात नोटांचा हार घालून पत्नीसोबत डान्स; Video Viral

RCB vs GT: विराट कोहलीने गुजरात टायटन्सला दाखवला, 'बाबाजी का ठूल्लू' अन् फायनलला पोहचताच अनुष्काला मारली मिठी; Video Viral

Beed: साखरपुड्यानंतर PSIने अचानक लग्नाला दिला नकार, बंदुकीचा धाक दाखवल्याचा तरुणीच्या कुटुंबाचा आरोप

Sangli Crime: मुलगा होत नाही, माहेरहून सोनंही आणत नाहीस; पलूसमध्ये विवाहितेचा छळ, संशयास्पद मृत्यूने खळबळ

'लाल लाल करलची बांगडी...' संजू राठोडच्या गाण्यावर जान्हवी किल्लेकरचा डान्स, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

SCROLL FOR NEXT