कोकण

जिद्दीच्या जोरावर करवंद विकणारा तरूण झाला पोलिस

CD

-rat११p१.jpg -
26O36659
देवरूख ः मंगेश आपल्या आई-वडील व भावासह.
---
करवंद विकणारा तरुण बनला पोलिस
मंगेश फोंडेचे यश; अंधाऱ्या वस्तीतील कष्टाने पाडला प्रकाश
दीपक कुवळेकर : सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. ११ : आंबाघाटात करवंदे आणि जांभळे विकून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवणारा मंगेश फोंडे हा तरुण आता पोलिस झाला आहे. ज्या वस्तीत तो लहानाचा मोठा झाला तिथे आजही विजेचा पत्ता नाही; मात्र मंगेशने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या अंधाराला छेद देत यशाचा उजेड पाडला आहे.
​मंगेश हा आंबाघाटातील अतिदुर्गम अशा ‘दख्खन धनगरवाडी पूर्व’ येथील एका अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा. त्याचे आई-वडील शेती आणि पशुपालन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घराची परिस्थिती बेताचीच असल्याने शिक्षणासाठी पैशांची जुळवाजुळव करणे हे एक मोठे आव्हान होते; पण मंगेशने हार मानली नाही. तो जंगलातून करवंदे आणि जांभळे गोळा करून कुड्याच्या पानात गुंडाळून महामार्गावर विकायचा. एवढेच नाही, तर आंबाघाटातील एका छोट्या टपरीवर आंबा, फणस आणि मका भाजून विकण्याचे कामही त्याने केले. यातून मिळणाऱ्या पैशांतून त्याने आपला शिक्षणाचा खर्च भागवला आणि आई-वडिलांना आर्थिक हातभार लावला.
​मंगेशचे प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत दख्खनच्या शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी तो साखरपा येथील महात्मा गांधी विद्यालयात आला आणि तिथल्या वसतिगृहात राहून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पोलिस भरतीसाठी त्याने अपार मेहनत घेतली आणि आज त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. मंगेशने एनटीसी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवले आहे.
------
इतरांच्या जीवनातही प्रकाश
मंगेशने केवळ स्वतःसाठी कष्ट उपसले नाहीत, तर आपल्या भागातील इतर तरुणांचे आयुष्य सावरण्यासाठी ‘संत बाळूमामा करिअर अॅकॅडमी’ सुरू केली. या अॅकॅडमीच्या माध्यमातून त्याने मार्गदर्शनाचे काम केले. मंगेशसोबतच त्याचे दोन विद्यार्थी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पोलिसदलात चालक म्हणून भरती झाले आहेत.


कोट
माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझ्या कष्टकरी आई-वडिलांना देतो. आजही माझ्या वस्तीवर लाईट नाही; पण परिस्थितीचा बाऊ न करता मी कष्टावर विश्वास ठेवला. आंबाघाटात करवंदे विकतानाही माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझे ध्येय होते.
- मंगेश फोंडे, मुर्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT