कोकण

भाजपतर्फे वॉटर प्युरिफायर आणि संगणक संच भेट

CD

ratchl१११.jpg
26O36717
ः चिपळूण ः नागरी आरोग्यकेन्द्रास वॉटर प्युरिफायर व संगणक संच देताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व सहकारी.

भाजपतर्फे आरोग्य केंद्रास
संगणक, वॉटर प्युरिफायर भेट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः भाजप स्थापनादिन आणि खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वडनाका शहरातील नागरी आरोग्यकेंद्राला वॉटर प्युरिफायर आणि संगणक संच भेट देण्यात आले. पालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह नगराध्यक्ष उमेश सकपाळ आदींच्या हस्ते वस्तू प्रदान करण्यात आल्या.
या वेळी यादव म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दमदार, धडाडीचे आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा जिद्द, मेहनत आणि नेतृत्वगुणांचा उत्कृष्ट नमुना आहे. कोकणातील जनतेच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आणि विकासाच्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या वेळी गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, निहार कोवळे, वैशाली निमकर, अंजली कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT