कोकण

वेंगुर्ले आनंदवाडीमध्ये डॉ. आंबेडकर जयंती

CD

वेंगुर्ले आनंदवाडीमध्ये
डॉ. आंबेडकर जयंती
वेंगुर्ले ः डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई, दलित समाज सेवा मंडळ, आनंदवाडी, सावित्रीबाई महिला मंडळ, आनंदवाडी यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव ११ ते १४ एप्रिल या कालावधीत वेंगुर्ले-आनंदवाडी येथे साजरा होणार आहे. यानिमित्त उद्या (ता. १२) दुपारी ३ वाजता चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा व मुलांच्या विविध स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता वेशभूषा स्पर्धा, सोमवारी (ता. १३) सायंकाळी ४ वाजता महिलांच्या विविध स्पर्धा व फनी गेम, मंगळवारी (ता. १४) सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण व भीमवंदना, १० वाजता मुलांची भाषणे, ११.३० वाजता दुचाकी रॅली, दुपारी ३ वाजता जाहीर अभिवादन सभा होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष चैत्राली जाधव, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष प्रेमानंद जाधव, दलित सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास जाधव, नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक युवराज जाधव उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता सामाजिक ऐक्य व सद्‍भावना मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
........................
आचऱ्यात २५ ला
‘कराओके’ स्पर्धा
आचरा ः रॉयल मालवणी सिंधुदुर्गने आचरा येथे कराओके जिल्हा गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २५ एप्रिलला दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत लौकिक सांस्कृतिक भवन, हॉटेल सिरॉक शेजारी येथे होणार आहे. प्रथम ६६६६, द्वितीय ४४४४, तृतीय पारितोषिक २२२२ रुपये व प्रत्येकी चषक तसेच पदके, प्रमाणपत्रे, एक उत्तेजनार्थ पारितोषिकही दिले जाईल. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होईल. पहिल्या फेरीत स्पर्धकांना मराठी गीतातील मुखडा व पहिला अंतरा सादर करावा लागेल. फेरीतून सर्वोत्तम १५ स्पर्धकांची निवड करून त्यांना दुसऱ्या फेरीत हिंदी गीत पूर्ण सादर करावे लागेल. स्पर्धेचे परीक्षण स्वरबद्धता, तालबद्धता, एक्सप्रेशन्स, गाण्याची निवड व सादरीकरण या निकषांवर केले जाणार आहे. स्पर्धकांनी नोंदणी निश्चित केल्यानंतर दोन्ही कराओके ट्रॅक आयोजकांनी दिलेल्या ई-मेलवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. सिद्ध सकपाळ, डॉ. अमोल हुले, संदेश रावले येथे संपर्क साधावा.
...........................
कोळंब येथे घरावर
झाड पडून नुकसान
मालवण ः कोळंब येथील सुधीर बांदेकर यांच्या घरावर शुक्रवारी (ता. १०) दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरालगत असलेल्या जागेतील जीर्ण झालेले आंबा कलम कोसळले. यात घराच्या छप्पराचे आणि सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये छप्पर, कपाट तसेच अन्य साहित्य मिळून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी तलाठी यांना माहिती दिली असून त्यांनी नुकसानीची पंचयादी घातली आहे. शुक्रवारी दुपारी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुधीर बांदेकर यांच्या घरालगत असलेल्या जमिनीतील जुनाट आंबा कलम मोठा आवाज करून कोसळले. यावेळी घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत ग्रामपंचायतीलाही माहिती दिली आहे. उपसरपंच विजय नेमळेकर यांनी नुकसानीची पाहणी केली.
..........................
कुडाळात २५ ला
खगोल मार्गदर्शन
कुडाळ ः ‘चला कुडाळ घडवूया’च्या तिसऱ्या पर्वांतर्गत येथे २५ एप्रिलला शहरातील विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रातील संधींबाबत मार्गदर्शन व आकाशदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांना आकाशदर्शन घडविण्यासाठी येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या (कुडाळेश्वरवाडी) प्रांगणात सायंकाळी ६.३० ते रात्री १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.
---
आंजिवडेत आज
धार्मिक कार्यक्रम
माणगाव ः आंजिवडे येथील सातेरी मंदिरात उद्या (ता. १२) सकाळी ८ वाजता सहपरिवार संप्रोक्षण (शुद्धीकरण) व होम विधी कार्यक्रम आयोजित केला आहे. ग्रामस्थ, माहेरवाशिणी, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख गावकरी मंडळींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT