लोगो ः कणकवली उपजिल्हा रुग्णालय
----------
36735
आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर पारकरांचे बोट
रुग्णांच्या तक्रारींचा पाढा; तातडीच्या सुधारणा करण्याचे प्रशासनाला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ : येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध मूलभूत सुविधांबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अचानक भेट देत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी स्वच्छता, वीज व्यवस्था, पाणीपुरवठा, आवश्यक साधनसामग्रीचा अभाव, अपुरी वैद्यकीय यंत्रणा यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्ष पारकर यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून रुग्णालयातील स्थितीची माहिती दिली. तसेच रुग्णालयातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी श्री.पारकर यांनी काही डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचे रुग्णांनी कौतुकही केले. विशेषतः डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील, डॉ. माधव उबाळे, डॉ. धनंजय रासम आणि डॉ. सर्व्हेश तायशेट्ये यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा डॉक्टरांमुळेच रुग्णालयावर विश्वास टिकून असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडीत झालेली बदली तत्काळ रद्द करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली.
---------------
नगराध्यक्ष पारकरांनी दिलेले आदेश
आधुनिक यंत्रसामग्री वापरासाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमा, ‘टू डी इको’सारख्या सुविधा उपलब्ध करा, रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याची गरज, उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या टाळा, सुधारलेली आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ देऊ नका, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांना सुविधांबाबत आदेश.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.