कोकण

अगस्त अलमानला ब्लॅक बेल्ट

CD

अगस्त्य आलमानला
‘ब्लॅक बेल्ट’
चिपळूण ः परशुराममधील एस. पी. एम. इंग्लिश मीडियमच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थी अगस्त्य आलमान याने नुकतेच रत्नागिरी येथे आयोजित तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्रतिष्ठेचा ‘ब्लॅक बेल्ट’ प्राप्त करून यश संपादन केले. अगस्त्य हा ब्लॅक बेल्ट मिळवणारा शाळेच्या प्राथमिक विभागातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याला अर्जुन कलगुटकी (चिपळूण) यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उमेश सकपाळांची
ब्राह्मणसंघाला भेट
चिपळूण : नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी येथील ब्राह्मण साहाय्यक संघाला सदिच्छा भेट दिली. ही भेट घडवून आणण्यात श्रीदेव वीरेश्वर भक्त विश्वास देवधर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघाच्या आवारातील श्रीदेव वीरेश्वर मंदिराच्या मागील भागात सखल भाग आहे. त्यात मातीची भर घालून सपाटी करण्याचा प्रस्ताव होता म्हणून ही भेट होती. सकपाळ यांनी श्रीदेव वीरेश्वराचे दर्शन घेतले. पुजारी सचिन चितळे आणि संघाचे अध्यक्ष अविनाश पोंक्षे यांनी देवाचा प्रसाद म्हणून नगराध्यक्षाना श्रीफळ दिले. कार्याध्यक्ष डॉ. जयंत मेहेंदळे यांनी अध्यक्ष आणि सर्व मंडळींचे स्वागत केले. नगरसेवक अविनाश पिसे, कपिल शिर्के आणि शीतल देसाई या वेळी उपस्थित होते.

‘आरोग्यसंपन्न गाव’
चिपळूणमध्ये
चिपळूण : उपजिल्हा रुग्णालय, कामथे (चिपळूण) येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्वाकांक्षी अभियानाचा प्रारंभ ‘आरोग्यदायी वृक्षारोपण’ करून उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन भारतीय जनता पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्या रावी मोरे, महिला व बालकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्त डॉ. वनमाला खरात-माने, एकात्मिक बालविकास प्रकल्प-१चे अधिकारी नायकुडे, प्रकल्प-२च्या अधिकारी प्रीती शिगवण तसेच रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजय कांबळे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कांचन मदार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात हे अभियान अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

SCROLL FOR NEXT