कोकण

नारायण राणे यांचे कोकणप्रेम ''असीम''

CD

36760

नारायण राणेंचे कोकणावर
अपार प्रेम ः केसरकर

सावंतवाडीत विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः नारायण राणे हे कोकणावर प्रेम करणारे नेते आहेत. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री झाले तरी कोकणावरची त्यांची माया कमी झाली नाही, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिनी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रम राबविण्यात आले. श्री. केसरकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सदिच्छा व्यक्त केली. श्री. केसरकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ महिला कीर्तनकार लालिन तेली, पत्रकार दिव्या वायंगणकर, अनुजा कुडतरकर, मितल धुरी, विभावरी परब यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेमध्ये विणा साटेलकर प्रथम, द्वितीय अनघा सावंत, तृतीय क्रमांक साधना मोरे व करुणा कुमठेकर यांनी पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण विभावरी परब यांनी केले. वेशभूषा स्पर्धेत नंदन कुमठेकर या चिमुकल्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. रात्री दशावतार नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, शिवसेना नेते अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, प्रेमानंद देसाई, राकेश पवार, नगरसेविका स्नेहा नाईक, उत्कर्षा सासोलकर, सुप्रिता धारणकर, शिवानी पाटकर, भारती परब, पूजा नाईक, राजश्री निर्गुण, अनघा सावंत, साधना मोरे, करुणा कुमठेकर, अनुष्का कलंबिसकर, संजना आंबेरकर, आयरिन डिसा, अर्चना बोंद्रे, संचिता केनवडेकर, शुभांगी तुयेकर, शीतल नाईक, कांचन जाधव, निर्जरा सावंत, सिद्धी निंबाळकर, हर्षा जाधव, रुची परब, शुक्ता पडवेकर, श्वेता साटेलकर, सेजल केनवडेकर आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT