कोकण

होडावडे येथील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

CD

होडावडा येथील तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या;
नऊ दिवसांत दोन तालुक्यांतील पाचवा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः होडावडा (ता. वेंगुर्ले) येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अँथोनी डिसोजा (वय २२, रा. होडावडा, सुभाषवाडी) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार काल (ता. १०) रात्री उशिरा उघड झाला. सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यांत गेल्या नऊ दिवसांत तिशीच्या आतील तरुणांनी आत्महत्या केल्याचा तब्बल पाचवा प्रकार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अँथोनी याने रात्री अकराच्या सुमारास घरासमोरील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी काही तास आधी त्याने आपल्या मित्रांसोबत मौजमस्ती केली होती. त्या आनंदी वातावरणातून परतल्यानंतर अचानक त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आला. त्याला रात्री एकच्या सुमारास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमागचे कारण मात्र स्पष्ट झाले नव्हते. या कठीण प्रसंगात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी तातडीने धाव घेत सहकार्य केले.
दरम्यान, गेल्या नऊ दिवसांत सावंतवाडी तालुक्यात चार, तर वेंगुर्ले तालुक्यात एकाने आयुष्य संपवले आहे. सर्वजण तिशीच्या आतील आहेत. याबाबत जाधव म्हणाले, ‘‘असे प्रकार रोखण्यासाठी आम्ही लवकरच जागृती मोहीम राबवणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT