36771
कणकवली रेल्वे स्टेशनमध्ये
गरजूंना व्हीलचेअर सुविधा
संकल्प प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य
कणकवली, ता. ११ : रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांसाठी संकल्प प्रतिष्ठानतर्फे (सिंधुदुर्ग) येथील रेल्वे स्टेशनवर व्हीलचेअर उपलब्ध करून देत एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे प्रवासादरम्यान अडचणीत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गरजू व्यक्तींना स्टेशन परिसरात सुलभ हालचाल करणे शक्य होणार आहे.
यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरादअली शेख, सचिव अमोल भोगले, सुजाता भोगले-सावंत, अमोल परब, मनोज सावंत, कणकवली रेल्वे स्टेशनचे इंचार्ज श्री. चिपळूणकर, स्टेशन मास्टर तसेच संकल्प परिवार सदस्य किशोर सोगम आदी उपस्थित होते. संकल्प प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग ही संस्था गेली १५ वर्षे उद्योजकीय प्रशिक्षण, नवीन उद्योजक घडविणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. यासोबतच विविध सामाजिक उपक्रमांतूनही संस्था समाजाशी बांधिलकी जपत कार्य करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.