कोकण

जिल्ह्यात एसटीतील ९४० पदे रिक्त

CD

जिल्ह्यात एसटीतील ९४० पदे रिक्त
कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण ; भरतीमुळे समस्या सुटण्याची आशा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ ः रत्नागिरी विभागातील एसटी सेवेला सध्या रिक्त पदे आणि नादुरुस्त बसेसचा मोठा फटका बसत आहे. विभागात चालक, वाहकांसह विविध श्रेणीतील तब्बल ९४० पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. मात्र, महामंडळाच्या आगामी मेगा भरतीमुळे या समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
मनुष्यबळ कमी असल्याने उपलब्ध चालक-वाहकांना दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. आगामी काळात जिल्ह्यात ई-बसेस, राजमाता जिजाऊ बसेस आणि स्मार्ट बसेस दाखल होणार आहेत, मात्र त्यासाठी लागणारे पुरेसे चालक आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. सध्या विभागात ६२६ चालक, १ हजार ३८८ वाहक आणि ४३३ चालक-कम-वाहक अशा एकूण २ हजार ४४७ कर्मचाऱ्यांच्या बळावर गाडा हाकला जात आहे. एसटी महामंडळाने राज्यभरात १७ हजार ७४२ जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून, यामुळे रत्नागिरी विभागातील मनुष्यबळाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तत्कालीन विभाग नियंत्रकांनी रिक्त पदांचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच पाठवला होता.

चौकट
विभागातील रिक्त पदे
* चालक व वाहक: ५४५
* यांत्रिक कर्मचारी: ३२०
* लिपिक: ५०
* वाहतूक नियंत्रक: २५
* एकूण रिक्त पदे: ९४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

SCROLL FOR NEXT