कोकण

आरोग्य संपन्न गाव समिती स्थापन

CD

rat12p5.jpg-
36818
देवरुख ः ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थ.

वाशी तर्फे देवरुख ग्रामसभेत
आरोग्य संपन्न गाव समिती स्थापन
देवरुख, ता. १२ ः ''माझं गाव आरोग्य संपन्न गाव'' या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वाशी तर्फे देवरुख येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला असून, गावाच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी या ग्रामसभेमध्ये विशेष ''आरोग्य संपन्न गाव समिती''ची स्थापना करण्यात आली.
हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविले जाणार आहे. गावातील आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी समितीच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रमांवर देखरेख ठेवली जाणार आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री. लोटणकर, समुदाय आरोग्य अधिकारी प्रसाद व्हालकर, सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत आणि माजी सरपंच विष्णू सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गावाच्या उज्ज्वल आरोग्यासाठी प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले. या ग्रामसभेला गणपत सावंत, महेंद्र कांबळे, सी.आर.पी. लक्ष्मी सावंत, मनीषा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अनुष्का सावंत, सायली सावंत यांसह आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षण वृंद आणि महिला बचत गटांच्या अध्यक्षा व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT