

Disturbing Incident in Badlapur Raises Concerns Over Child Safety at Home Visits
sakal
बदलापूर: बदलापूर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली. वडिलांच्या मित्रानेच सोळावर्षीय मुलीशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा प्रकार बदलापूर पूर्व परिसरात घडला असून, याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी ४१ वर्षीय आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये मंगळवारी (ता. १९) गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.