कोकण

समाधान शिबिरात १७ गावांतील नागरिकांना लाभ

CD

सतरा गावांतील नागरिकांना
समाधान शिबिरात लाभ
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. १२ : महसूल विभागाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित केलेले ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'' दापोली तालुक्यातील गावतळे येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये वाकवली मंडळ अधिकारी क्षेत्रातील १७ गावांतील नागरिकांनी विविध दाखल्यांसाठी आणि शासकीय कामांसाठी मोठी गर्दी केली होती.
या शिबिराचे उद्घाटन करताना तहसीलदार अर्चना बोम्बे म्हणाल्या, "आम्ही या शिबिरांच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर होतील. सर्वच विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी येथे उपस्थित असल्याने कामात गती येत आहे." तसेच उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले, "जोपर्यंत ग्रामस्थ आपली कामे घेऊन येतील, तोपर्यंत हे शिबिर सुरू ठेवले जाईल. वाकवली मंडळ अधिकारी क्षेत्रातील १७ गावांतील ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या शिबिराला उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोम्बे, किशोर देसाई, प्रभाकर गोलांबडे, निलेश शेठ, विधी पवार, विशाल म्हाबदी, एन. वाय. पवार, उत्तम पवार, प्रदीप म्हाबदी, वाकवली मंडळ अधिकारी क्षीरसागर मॅडम, डॉ. प्रियांका शिंदे आणि विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ''इतिहासात असं कधी झालं नाही....'', जरांगेंचं उपोषण सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Chandrapur: ९३ गुंतवणूकदारांची २.७७ कोटींनी फसवणूक; तीन आरोपी चार वर्षांपासून फरार

Shahu Chhatrapati on Manoj Jarange : ''जरांगेंना कोल्हापूर गॅझेटपेक्षा हैदराबाद गॅझेट जवळचं वाटतं''; खासदार शाहू छत्रपती संतापले, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उद्रेक

Latest Marathi Update Live: समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचे रास्ता रोको

Chandrapur: पनीरच्या नावावर ‘चीज ॲनालॉग’चा खेळ; ग्राहकांची फसवणूक उघड; हॉटेल्समध्ये धक्कादायक प्रकार! पनीरऐवजी स्वस्त चीज ॲनालॉग

SCROLL FOR NEXT