कोकण

आंबडवेवासीयांना घोषणांचे गजर, विकास ठप्पच

CD

rat12p11.jpg-
36855
आंबडवे : बाबासाहेबांच्या मुळगावातील घराच्या जागेवर बांधलेले स्मारक.


आंबडवेवासीयांना घोषणांचे गाजर, विकास कागदावरच
राष्ट्रपती, राज्यपालांच्या फक्त भेटीच ; महामानवाचे मुळगाव उपेक्षित
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १२ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. राष्ट्रपती, राज्यपाल, विविध केंद्रीय व राज्य मंत्र्यांनी वेळोवेळी भेट देत विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात गावाचा चेहरा बदलण्याची प्रक्रिया अजूनही अपूर्णच आहे. गेल्या काही वर्षांत आंबडवे येथे स्मारक विकास, पर्यटन केंद्र उभारणीच्या घोषणा केल्या होत्या. उच्चपदस्थांच्या भेटीनंतर योजनांची चर्चा रंगली; पण त्या बहुतेक कागदावरच राहिल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे गावात तात्पुरती स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, रोषणाई आणि कार्यक्रमांची लगबग दिसत असली, तरी वर्षभर पाणीपुरवठा, रस्ते, पर्यटन सुविधा आणि माहिती केंद्राचा अभाव कायमच आहे. महामानवाचे मुळगाव म्हणून देशभर ओळख असलेल्या आंबडवेचा अजूनही अपेक्षित विकास का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आंबडवे ही केवळ नतमस्तक होण्यापूर्ती स्फूर्तीभूमी राहिली आहे का, की ती विचारांचे आणि विकासाचे प्रेरणास्थान म्हणून उभी राहणार, याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या जयंतीनिमित्त होऊ घातलेल्या कार्यक्रमात तरी घोषणांची अंमलबजावणीसाठी पावले उचलली जातील, अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

चौकट १
अपेक्षित विकासाच्या मागण्या
* राष्ट्रीयस्तरावरील अत्याधुनिक स्मारक व संग्रहालय
* पर्यटनासाठी सुसज्ज सुविधा (निवास, मार्गदर्शन केंद्र)
* दर्जेदार रस्ते व वाहतूक व्यवस्था
* स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती
* ‘प्रेरणास्थळ’ म्हणून आंबडव्याची ओळख मजबूत

कोट १
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबडवे पुन्हा उजळते. पण हा उजेड केवळ काही दिवसांचाच असतो. राष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री यांच्या भेटी होतात. व्यासपीठावरून विकासाच्या घोषणा केल्या जातात आणि नंतर सर्वाकाही शांत होते. जयंती आली की आंबडवे सजते, स्वच्छता होते, रस्त्यांवर डांबर पडते, कार्यक्रमांची रेलचेल वाढते. पण जयंती संपताच वास्तव समोर येते. अपूर्ण सुविधा, रखडलेले प्रकल्प, आणि मूलभूत गरजांसाठी झगडणारे गाव असेच चित्र आहे.
- आदेश मर्चंडे, नगरसेवक

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

Breaking News Live Update: अनियंत्रित इंधन टँकरनं पुलाखालील वाहनांना चिरडलं

Pune Village Jatra: दिवे गावच्या कातोबानाथ यात्रेला उत्साहाची झळाळी; कुस्ती आखाड्यात 220 मल्लांची दमदार हजेरी

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीया का साजरी केली जाते? या पौराणिक कथांशी आहे संबंध...

SCROLL FOR NEXT