कोकण

ऑलिव्ह रिडले प्रजातीची ९५ पिले झेपावली समुद्रात

CD

36873

ऑलिव्ह रिडले प्रजातीची
९५ पिले झेपावली समुद्रात

जैवविविधतेच्या संवर्धनास मोठे यश

मालवण, ता. १२ : तालुक्यातील वायरी भूतनाथ समुद्र किनाऱ्यावर निसर्ग संवर्धनाचा एक सुखद सोहळा नुकताच पार पडला. १७ फेब्रुवारी रोजी सुरक्षितरीत्या जतन केलेल्या अंडी उबवणी केंद्रातून तब्बल ५२ दिवसांच्या कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले प्रजातीची ९५ पिले सुखरूप बाहेर पडली. या चिमुकल्या पाहुण्यांना कासव मित्र आणि वनविभागाच्या मदतीने रात्रीच्या वेळी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच समुद्रात सोडण्यात आले.
१७ फेब्रुवारी रोजी स्थानिक रहिवासी लतिका प्रशांत पाटकर यांना समुद्र किनाऱ्यावर एक कासव अंडी घालण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत त्वरित ''युथ बीट्स फॉर क्लायमेट'' या संस्थेला कळवले. संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता ते कासव दुर्मिळ ''ऑलीव्ह रिडले'' प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कांदळवन विभागाला पाचारण करण्यात आले आणि बीच मॅनेजरमार्फत तिथून ११४ अंडी रेस्क्यू करण्यात आली.
अंड्यांच्या सुरक्षिततेसाठी कांदळवन कक्ष दक्षिण कोकण (वनपरिक्षेत्र मालवण) यांच्या मार्गदर्शनाखाली वायरी भूतनाथ येथील कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये ही अंडी स्थलांतरित करण्यात आली होती. गेल्या ५२ दिवसांपासून या केंद्रात अंड्यांची विशेष देखभाल घेतली जात होती. १० एप्रिल २०२६ रोजी रात्री १२ ते १२.३० च्या सुमारास अंड्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. ही बाब स्थानिक कासव मित्र श्रीकांत माडये यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ कांदळवन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर सर्व ९५ पिल्लांना अतिशय सुरक्षितरीत्या लाटांच्या प्रवाहात सोडून दिले. मोहिमेत कासव मित्र गणेश माडये, रसिका माडये, युगा माडये, संजू भगत, अमर मातोंडकर, विनय मातोंडकर आणि सौरभ मातोंडकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पिल्लांना समुद्राचा रस्ता दाखवला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या नियोजनामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनास मोठे यश मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

SCROLL FOR NEXT