कोकण

वातावरण बदलाचा ‘रायवळ’लाही फटका

CD

rat12p14.jpg-
36884
राजापूर ः रायवळ आंब्याचे झाड.
--------

वातावरण बदलाचा ‘रायवळ’लाही फटका
उत्पादनात मोठी घट ; हापूस आवाक्याबाहेर
राजापूर, ता. १२ ः वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांचा परिणाम केवळ हापूस आंब्यावरच नव्हे, तर ग्रामीण भागातील ''रायवळ'' (गावठी) आंब्यावरही झाला आहे. यंदा अनेक ठिकाणी रायवळ आंब्याला मोहोरच न आल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. हापूसचे दर गगनाला भिडलेले असताना, सर्वसामान्यांना रायवळ आंब्याचा मोठा आधार असतो; मात्र यंदा ही चव चाखण्याची संधीही कमी मिळणार असल्याचे चित्र आहे.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही रायवळ आंब्यासाठी प्रतिकूल वातावरण राहिले आहे. याचा थेट परिणाम फळधारणेवर झाला असून बागायतदारांच्या पदरी निराशा आली आहे. हापूस आंबा सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा स्थितीत रायवळ आंब्यापासून तयार केला जाणारा आमरस आणि लोणचे यांचा आस्वाद नागरिक मोठ्या प्रमाणात घेतात. मात्र, उत्पादन घटल्याने बाजारात रायवळ आंब्याची आवक कमी राहील, परिणामी सर्वसामान्यांना या अस्सल गावठी चवीपासूनही वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चौकट
लोप पावत चाललेल्या आमराई!
काही वर्षांपूर्वी गावाच्या वेशीवर आणि घरांच्या शेजारी मोठ्या आमराई पाहायला मिळत असत. मे महिन्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाऊन झाडावरचे आंबे खाण्याची मजा बच्चे कंपनी लुटत असे. या डेरेदार झाडांमुळे उन्हाळ्यातही घरातील वातावरण थंड राहत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत या वृक्षांची तोड झाल्याने आंब्यांनी लगडलेल्या आमराई इतिहासजमा होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT