कोकण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

CD

rat१२p८.jpg-
26O36956
बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेताना रत्नागिरी नगरपालिकेतील भाजप-शिवसेना महायुतीच्या महिला नगरसेविका.
----
नगरसेविकांचा बारामती अभ्यासदौरा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट ; स्थानिक प्रश्नांवर चर्चा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः रत्नागिरी नगरपालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेना महायुतीच्या नगरसेविकांनी नुकताच बारामती येथे विशेष अभ्यासदौरा केला. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन शहरातील विकासकामे, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि दक्षिण रत्नागिरी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या पुढाकारातून या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेविकांनी आपापल्या प्रभागातील अडचणी व विकासाच्या गरजा सुनेत्रा पवार यांच्यासमोर मांडल्या. या संवादामुळे रत्नागिरी शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नगरसेविकांनी कटिबद्धता दर्शवली.
या दौऱ्यात भाजप-महायुतीच्या नगरसेविका वर्षा ढेकणे, स्मितल पावसकर, प्रीती सुर्वे, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, सायली पाटील, श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, आफरीन होडेकर मेधा कुळकर्ण, पूजा पवार, जागृती पिलणकर, निवेदिता कळंबटे, रुक्सार खान, नाहिदा सोलकर आदी उपस्थित होत्या.
याप्रसगी केंद्र व राज्य शासनाच्या ‘नारीशक्ती वंदन’ अभियानांतर्गत महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यावर विशेष भर देण्यात आला. नारीशक्ती वंदन कायद्यामुळे महिलांना मिळालेले राजकीय आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधींचे वाढलेले महत्त्व यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

Dr Babasaheb Ambedkar : 'या' मोठ्या घटनेनंतर डॉ. आंबेडकरांनी दिली होती रायगडाला ऐतिहासिक भेट, एक दिवस केला होता मुक्काम

"कॅन्सरचे उपचार सुरु असतानाही त्याने.." मराठी अभिनेत्याने उघड केली रमेश भाटकरांची अखेरची इच्छा; म्हणाले..

Leopard Entered Muktainagar : अवघ्या 5 फुटांवरून बिबट्यावर डागले दोन अचूक 'डॉट'; हातात काठी घेऊन स्वतः आमदार मैदानात, मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला कसं पकडलं?

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

SCROLL FOR NEXT