कोकण

पद्मश्री गंगावणे यांनी उलगडले लोककलेचे पैलू

CD

- rat१३p१.jpg -
26O37008
रत्नागिरी ः येथील आर्ट महाविद्यालयामध्ये लोककलेतील पैलूंवर मार्गदर्शन करताना पद्मश्री परशुराम गंगावणे तर दुसऱ्या छायाचित्रात कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी.

चित्रकथीला आधुनिकतेची जोड
कलेचा प्रवास उलघडला ; रत्नागिरीत कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १३ ः पारंपरिक लोककला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवत ‘आगम दी कॉलेज’मध्ये ‘पिंगुळी चित्रकथी’ कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रकथीचा गौरवशाली प्रवास उलगडला आणि बदलत्या काळात कलेचे महत्त्व अधोरेखित केले.
रत्नागिरी येथील उज्ज्वल शिक्षण मंडळ संचलित ‘आगम दी कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट’ मध्ये नुकतीच गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पिंगुळी चित्रकथी’ कार्यशाळा झाली. विशेष सत्रात गंगावणे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीतून चित्रकथीची सुरुवात, तिचा ऐतिहासिक प्रवास आणि सादरीकरणाची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. बदलत्या डिजिटल युगात लोककलेचे स्थान आणि तंत्रज्ञानासोबत तिचा संगम कसा साधता येईल यावर गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन कलेचा प्रसार करण्यावर या वेळी विचारमंथन झाले. एकनाथ गंगावणे यांनी प्रत्यक्ष चित्रकथीचे सादरीकरण करून दाखवले. एकनाथ गंगावणे आणि डॉ. शशांक पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संचालक सुहास भोळे, विनायक हातखंबकर, उदय शिंदे, तसेच संतोष गोरिवले, मकरंद राणे, भाविका देवरूखकर, नीलेश शिळकर, विजय पडावे, मधुरा घारपुरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT