swt1310.jpg
37038
कुडाळ : जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेता ठरला.(छाया : अजय सावंत)
पंचक्रोशी जामसंडे संघ विजेता
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा : कुडाळ लाजरी क्रिकेट ग्रुपतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ : येथील लाजरी क्रिकेट ग्रुपतर्फे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे संघ विजेता तर श्री लक्ष्मीनारायण वालावल संघ उपविजेता ठरला.
सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि लाजरी क्रिकेट ग्रुपतर्फे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा येथे झाली. यात जिल्ह्यातील नामांकित संघांनी सहभाग नोंदवला. विजेत्या पंचक्रोशी जामसंडे संघाला २५,००० रुपये, उपविजेत्या श्री लक्ष्मीनारायण वालावल संघाला १५,००० रुपये, तृतीय- यंगस्टार कणकवली ५,००० रुपये व चतुर्थ क्रमांक पंचक्रोशी फोंडा संघाला ५,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीबद्दलही खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट चढाईचा मान निखिल चव्हाण (श्री लक्ष्मीनारायण वालावल) यांना मिळाला. उत्कृष्ट पकडीसाठी श्रीराम भडसाळे (पंचक्रोशी जामसंडे) यांचा गौरव करण्यात आला. अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशील पाटकर (पंचक्रोशी जामसंडे) यांनी मान पटकावला. या स्पर्धेमळे स्थानिक कबड्डी खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली. यावेळी लाजरी क्रिकेट ग्रुप अध्यक्ष राजु पाटणकर, राजेश म्हाडेश्वर, नगरसेवक अभी गावडे, चेतन पडते, निलेश आळवे, दादा नेवाळकर, स्वरूप सावंत, सदा अणावकर, प्रितम कवठकर, दिपक (भाऊ) भोगटे, अनुप शिरसाट, नितीन सोलकर, कृष्णा तेली, अक्षय सावंत, दिनार शिरसाट नागेश नार्वेकर, मामा घावनळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.