कोकण

सावंतवाडी नॅब रुग्णालयात मोफत तपासणी, शस्त्रक्रिया

CD

37039

सावंतवाडी नॅब रुग्णालयात
मोफत तपासणी, शस्त्रक्रिया

सावंतवाडी, ता. १३ : येथील भटवाडी स्थित नॅब नेत्र रुग्णालयाने चौथ्या वर्षात पदार्पण केले असून, या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी ३० मेपर्यंत डोळ्यांची विनामूल्य तपासणी आणि मोफत शस्त्रक्रियांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा लाभ सर्व गरजू रुग्णांनी घेण्याचे आवाहन रुग्णालय व्यवस्थापनाने केले आहे.
​रुग्णालयाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त ९ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायंकाळी ४:३० ते ७:३० या वेळेत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. ​या विशेष मोहिमेअंतर्गत रुग्णांना केवळ मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियाच नव्हे, तर अत्यंत अल्पदरात चष्मे सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे शिबिर ३० मेपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहील. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे नॅब नेत्र रुग्णालयामार्फत कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT