कोकण

ग्रामीण भागातील ६,५०० किमी रस्त्यांची अवस्था वाईट

CD

rat13p22.jpg
37082
रत्नागिरी ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची झालेली दुरवस्था.
------------

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था
उपाध्यक्ष विलास चाळके ः दुरूस्तीसाठी लागणार विशेष पॅकेज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. येत्या पावसाळ्यात एसटीची सेवा खंडित होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बांधकाम समितीने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी शासनाकडून स्वतंत्र आर्थिक पॅकेज मिळावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या बैठकीत घेतला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विलास चाळके यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दालनात बांधकाम समितीची पहिलीच बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांच्या सद्यःस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ग्रामीण भागात ६ हजार ५०० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे असून, त्यामध्ये एक हजार किलोमीटरच्या इतर जिल्हामार्गांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एसटी बसच्या अनेक फेऱ्या बंद कराव्या लागल्या होत्या, ज्याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला होता. ही परिस्थिती यंदा उद्भवू नये यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
रस्त्यांच्या या मोठ्या कामासाठी भरघोस निधीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री उदय सामंत आणि ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन जिल्ह्यासाठी विशेष पॅकेजची मागणी केली जाणार आहे. यामध्ये प्रमुख जिल्हामार्गांच्या दुरूस्तीचाही समावेश असेल. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांची पहिल्या टप्प्यात दुरूस्ती केली जाणार आहे.

चौकट...
खराब रस्त्यांची यादी करणार
एसटी सेवा कोणत्याही परिस्थितीत विस्कळीत होऊ नये यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी संयुक्तपणे खराब रस्त्यांची पाहणी करून त्यांची यादी तयार करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. ही यादी पुढील दोन ते चार दिवसांत समितीसमोर सादर करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर तातडीने दुरूस्तीच्या कामांना गती दिली जाणार असल्याचे सभापती विलास चाळके यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT