कोकण

गांडूळ खत प्रकल्प यशस्वी

CD

37091

गांडूळ खत प्रकल्प यशस्वी

फोंडाघाट कृषी महाविद्यालय; रासायनिक खताला उत्तम पर्याय

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १३ : फोंडाघाट येथील राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून गांडूळ खत प्रकल्प यशस्वीपणे राबविला आहे. महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीचे विद्यार्थी गांडूळ खत उत्पादनाचे प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत. रासायनिक खताला गांडूळ खत उत्तम पर्याय असल्याचे या विद्यार्थ्यांनी नमूद केले.
या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये गांडूळ खताबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी विविध सेंद्रिय पदार्थांचा (शेणखत, भाताचा पेंढा, गिरीपुष्प व गांडुळे) वापर करून मोठ्या प्रमाणात गांडूळ खताचे उत्पादन केले आहे. या उपक्रमासाठी राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटचे प्राचार्य संते, तसेच विषय शिक्षिका डॉ. दर्शना कदम यांनी मार्गदर्शन केले. चतुर्थ वर्षातील पी. सी. अभिनव, अमिषा के. आर., निखिल अनुसे, संकेत आरडे, राकेश असणेकर, अतुल सी. ए., सत्यजित आवळेकर, गणेश भाकरे, ओम भांगरे, प्रतीक भोपळे, प्रांजल भोसले, अथर्व भोवर, जयवंत बोकारे, प्रज्ञा देशमुख, राहुल डिगे, पायल डोंगरे, चेतन गाडे, कांचन गायकवाड, सानिका गोडसे, सुमेध गोंगाले, योगेश हाके, सुजित हाके, विश्वजित होनमाने, प्रथमेश इंगळे या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
----
...म्हणून गांडूळ खत आवश्‍यक!
शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतांपैकी गांडूळ खत हे अत्यंत उपयुक्त मानले जाते. रासायनिक खतांना गांडूळ खत हा एक उत्तम पर्याय आहे. सेंद्रिय पदार्थांच्या जलद विघटनामध्ये गांडूळ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्या वापरामुळे जमीन सुपीक बनते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karveer Panchayat Samiti incident : हाण की बडीव! करवीर पंचायत समितीत महिलेने थेट अधिकाऱ्याची धरली गळपट; व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

Pargav Politics: पारगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच नितीन ढोबळे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला; पद कायम

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

SCROLL FOR NEXT