कोकण

नांदगाव कोळंबाची तीन मे रोजी जत्रा

CD

37089

नांदगाव कोळंबाची
तीन मे रोजी जत्रा
नांदगाव : महाराष्ट्रसह अनेक राज्यात मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असणारी व भक्ताच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री देव कोळंबाची जत्रा ३ मे रोजी आयोजित केली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ मटण भिकारी महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. या जत्रेच्या तयारीला सुरवात झाली असून तरी जत्रोत्सवाची नोंद घेऊन भाविकांनी उपस्थित राहावे, आवाहन श्रीदेव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ नांदगावचे अध्यक्ष नागेश मोरये यांनी केले आहे.
-------
37063
तळेरेत शेवरा देवीचा
उद्या समारतन उत्सव
तळेरे : वाघाचीवाडी येथील हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या शेवरा देवीचा समारतन उत्सव १५ एप्रिल रोजी वार्षिक उत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तळेरे वाघाचीवाडी ग्रामस्थांनी केले आहे. यानिमित्त सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ब्राम्हणांच्या हस्ते देवीवर अभिषेक होईल. १२.३० वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शन आणि महाप्रसाद देण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
--------------
ओटवणेत उद्या
विविध कार्यक्रम
ओटवणे ः येथील सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. १५) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत ओटवणे येथे मातोश्री सेवाभाव आश्रम ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर, ९.३० ते दुपारी १२ पर्यंत ग्रामस्वच्छता अभियान संपूर्ण ओटवणे गावात सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, सायंकाळी ७ वाजता श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ पावशी यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग ‘भक्तांची पाठीराखी आदिमाया’, रात्री ८ वाजता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन दाजी सरपंच दाजी गावकर यांनी केले आहे.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT