कोकण

पेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तुषार गमरे बिनविरोध

CD

पेढे उपसरपंचपदी तुषार गमरे
ठाकरे सेनेचाही पाठिंबा; आमदार निकम समर्थकांचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः तालुक्यातील पेढे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तुषार गमरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच आरूषी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया झाली.
पेढे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे ठाकरे सेनेचे एकहाती वर्चस्व होते; मात्र, २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार शेखर निकम यांच्या समर्थकांनी सत्तांतर घडवून आणले. एकूण ११ जागांपैकी निकम समर्थकांनी ७ जागा जिंकून सत्ता काबीज केली, तर ठाकरेसेना गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. थेट सरपंचपदी आरूषी शिंदे निवडून आल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात अष्टविनायक टेरवकर आणि त्यानंतर निशिकांत माळी यांना उपसरपंचपदाची संधी दिली होती. माळी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी सोमवारी निवडणूक झाली. विरोधी ठाकरेसेनेच्या चारही सदस्यांनी तुषार गमरे यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिल्याने ही निवड बिनविरोध झाली. ग्रामपंचायत अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सरपंच आरूषी शिंदे, राजूभाई जाधव, सुनील गमरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

Banana Crop Damage: क्षणात होत्याचे नव्हते! वादळाने ४०० एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त; शेतकरी हवालदिल, लवंग परिसरात कोट्यवधींचे नुकसान

SCROLL FOR NEXT