कोकण

उपरकर यांच्या वाढदिनी आज आरोग्य शिबिर

CD

37119

उपरकर यांच्या वाढदिनी
आज आरोग्य शिबिर

कणकवली, ता. १३ : माजी आमदार परशूराम उपरकर यांचा वाढदिवस कार्यक्रम मंगळवारी (ता.१४) साजरा होणार आहे. यानिमित्ताने तेलीआळी मित्र मंडळ, मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, ठाकरे शिवसेना आणि परशुराम उपरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्तपणे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
श्री.उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. १४) सकाळी साडेदहा ते दुपारी तीन या वेळेत नेहरूनगर, कणकवली येथील भगवती हॉल येथे मोफत आरोग्‍य शिबिर होणार आहे. यात अँजियोप्लास्टी, कर्करोग, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मूत्र विकार, प्रोस्टेट, मोतीबिंदू, हर्निया, थायरॉईड, महिलांचे गर्भाशयाचे आजार, मणक्याच्या समस्या आदी विविध आजारांवर तपासणी आणि सल्ला दिला जाणार आहे. काही शस्त्रक्रिया मोफत तर काही अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या आरोग्‍य शिबिरात जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक व नेत्रतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT